Friday, May 20, 2022

अंगारकी चतुर्थी



 अंगारकी.....

कृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून अंगारक (निखारा). एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्यादिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान म्हणून अंगारकीची संभवनीयता सात मासांत एक. साधारणत: तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी येते.

मंगळ ग्रह आणि मंगळवार यांचा संबंध नावापुरताच. कुतिपुत्र अर्जुन आणि सचिनपुत्र अर्जुन याचा नाममात्र संबंध तसाच अंगारकीचा मंगळ ग्रहाशी सुतराम संबंध नाही.

चतुर्थीला अन्य तिथ्यांहून काही वेगळे महत्त्व आहे का? त्या तिथीला पृथ्वीवरून चंद्राचा विशिष्ट आकाराचा भाग प्रकाशित दिसतो हे खरे. पण ते केवळ दिसणे आहे. खरे काय आहे? सूर्यमालेतील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह हे निर्जीव गोलाकार पिंड (बॉडीज्) आहेत. त्यांना स्वत:चा प्रकाश नाही. सूर्याच्या प्रकाशात तरंगत फिरतात. त्यांच्या अर्ध्या भागावर प्रकाश असणार तर अर्ध्यावर अधार हे त्या सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.

प्रत्येक तिथीला चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित तर अर्धा अंधारित असतोच. (ग्रहणाचा कालावधी सोडून.) म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, चतुर्थीचा, अष्टमीचा, संकष्टीचा, अमावास्येचा चंद्र सारखाच अर्धा भाग प्रकाशित असलेला.चंद्र पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याच्या प्रकाशित भागातील कमी-अधिक भाग आपल्याला दिसतो. ती चंद्राकोर. समजा आपण यानात बसून अवकाशात गेलो. आणि चंद्राभोवती एक फेरी घातली. तर तेवढ्या वेळात आपल्याला अमावास्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावास्या अशा चंद्राच्या सर्व कला दिसतील. म्हणजे चतुर्थीच्या चंद्राचे कोणतेही अंगभूत वैशिष्ट्य नाही.

मंगळवाराला इतर वारांच्या तुलनेत वेगळे महत्त्व मुळीच नाही. जेव्हा बाजार-हाटासाठी सात दिवसाचे चक्र ठरले तेव्हा व्यावहारिक सोयीसाठी सात दिवसाना नावे द्यायचे सुचले ( इ.स.पू 2300). योगायोगाने ग्रहांची संख्याही सातच, त्यांना आधीच नावे दिली होती. तीच नावे, कोण्या एका दिवशी वारांना दिली. ती जगभर रूढ झाली. आजही तीच प्रचलित आहेत. हे नामकरण दोन दिवस आधी अथवा नंतर झाले असते तर 25-12 2018 या दिवशी मंगळवार नसता. चतुर्थी असती. पण अंगारकी नसती. कोणत्याही वाराला अंगभूत असे काही महत्त्व नसतेच. सर्व दिवस सारखेच, सोमवार शिवाचा, गुरुवार दत्ताचा याला काहीच अर्थ नाही. हे कॉमनसेसने समजते.

म्हणजे अंगारकी चतुर्थी हा इतर दिवसासारखा एक दिवस. मग या दिवशी गणेशमंदिरासमोर सहस्रावधी माणसे रांगा का लावतात ? अंगारकीला दर्शन घेतले, फुले, नारळ, पैसे वाहिले, की देव विशेष संतुष्ट होतो. कृपा करतो. समृद्धी लाभते. असे श्रद्धाळूना वाटते. तसेच रूढी, गतानुगतिकता यांचा पगडा असतोच. त्यामुळे रांगा लागतात. अंगारकीविषयी स्वबुद्धीने थोडा विचार केला तरी या दिवसाला कोणतेही महत्त्व नाही हे ध्यानी येईल. पण सत्य काय आहे ते जाणून घेण्यास नकार देणारी मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धावन्ताला सत्य नको असते. सदैव अज्ञानाच्या अवगुंठनात लपेटून राहाणे सुरक्षित वाटते. श्रद्धेची चिकित्सा करण्याचे धैर्य नसते. सुधारककार आगरकर लिहितात, "आपल्या प्राप्तीचा आकडा खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहाण्याचे धैर्य ज्याप्रमाणे दिवाळखोर कर्जबाजायस होत नाही त्याप्रमाणे श्रद्धाळूस आपल्या धर्मसमजुती आणि त्यावर आधारित आचार बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही. तसे केले तर त्या समजुर्तीची धडगत नाही अशी भीती त्याला वाटते."



Monday, May 16, 2022

त्रिपिटक ग्रंथातील तथागत गौतम बुद्ध यांचे विचार

"एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो. एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं,' असं  गौतम बुद्धानं म्हटले आहे. गौतम बुद्धाची विचारधारा अंतर्भूत असलेला 'त्रिपिटक' हा बौद्ध धर्माचा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय प्राचीन असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेला असून बुद्धाचं महापरिनिर्वाण होईपर्यंतची सगळी प्रवचनं यात संग्रहित केली गेली आहेत. या ग्रंथाची रचना इ.स.पूर्व १०० ते इ.स.पूर्व ५०० मध्ये केली गेली असून हा ग्रंथ कोणा एका व्यक्तीनं लिहिला नसून या ग्रंथनिर्मितीची कहाणी खूपच रोचक आहे.


त्रिपिटक - गौतम बुद्ध


(इसपू पहिलं शतक)


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे. दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुद्धाने सांगितली आहेत. 'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. 'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा. कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका, कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,' असं तथागत गौतम बुद्धांनी म्हटले आहे.


पाली भाषेत धर्म या शब्दाला धम्म, मिक्षू शब्दाला भिक्खू, गौतमाला 'गोतम' आणि त्रिपिटक या शब्दाला 'तिपिटक' असं संबोधलं गेलंय आणि त्यामुळेच बौद्ध धर्म न म्हणता 'बौद्धधम्मीय' अशा पाली भाषेतल्या शब्दांचाच प्रयोग करतात. 'त्रिपिटक' या ग्रंथानुसार धम्म म्हणजे परस्परसापेक्ष आणि परस्परनिरपेक्ष यांच्यामध्ये योग्य असं संतुलन ठेवून व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांचं सर्वोत्तम कल्याण साधणारी आणि त्यांना निकोप आनंद देणारी जीवनशैली म्हणजे तथागतांचा धम्म! ज्यानं यथार्थ ज्ञान प्राप्त केलं आहे त्याला पाली भाषेत 'तथागत' असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच गौतम बुद्धालादेखील 'तथागत' या नावानंही संबोधलं जातं.


गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ, हा सिद्धार्थ होता तरी कोण?


फार फार पूर्वी भारत देश जंबुद्वीप या नावानं ओळखला जायचा. महासागरांनी वेढलेल्या प्रदेशाला जंबुद्वीप असं म्हणत. जंबुद्वीपात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, तिबेट, भूतान, बांगलादेश, ब्रह्मदेश (आजचं म्यानम्यार) हे देश समाविष्ट होते. भारताच्या ईशान्य कोपऱ्यात त्या काळी शाक्य वंशाच्या राजांची सत्ता होती. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स.पूर्व ५६३ मध्ये • राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी इथे झाला होता. सिद्धार्थचा जन्म होताच सातव्या दिवशीच त्याच्या आईचं निधन झालं आणि राजा शुद्धोधनानं बाळ सिद्धार्थचं संगोपन चांगलं व्हावं म्हणून महामायाची बहीण गौतमी हिच्याशी विवाह केला. वयाच्या १९ व्या वर्षी सिद्धार्थचा विवाह राजकुमारी यशोधरा


हिच्याशी झाला. सिद्धार्थ ते गौतम बुद्ध या प्रवासाची गोष्ट सांगताना अनेक दंतकथांचा वापर करण्यात आला आहे.


या दंतकथांमधली एक कथा म्हणजे लहानपणापासून सिद्धार्थचं जीवन खूप लाडाकोडात गेलं होतं. दुःख म्हणजे काय असतं याची यत्किंचितही कल्पना सिद्धार्थला नव्हती. एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ राज्यातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असताना त्याला रस्त्यात जराजर्जर अवस्थेतला एक वृद्ध, रोगानं ग्रस्त एक मनुष्य, मृत व्यक्ती आणि एक संन्यासी अशा चार व्यक्ती दिसल्या. त्यांना पाहून सिद्धार्थला खूपच धक्का बसला. जसा माणसाचा जन्म होतो, तसाच त्याचा मृत्यूही अटळपणे होतोच, या जन्ममरणाचा फेरा कुणालाच चुकलेला नाही, ही गोष्ट आपल्या बरोबर असलेल्या सैनिकांशी बोलताना त्याला कळली. सिद्धार्थला त्याच वेळी यशोधरेला राहुल नावाचा पुत्र झाल्याची बातमी कळली. एकीकडे तो मृत्यूचं दृश्य बघत होता, तर दुसरीकडे जन्माचा आनंद साजरा होत होता. हे सगळं बघून सांसारिक गोष्टींमधली निरर्थकता त्याच्या लक्षात आली. राजपुत्र सिद्धार्थच्या मनात जीवनाबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी एके दिवशी तो आपली राजवस्त्रं आणि सगळ्या सुखसुविधा यांचा त्याग करून बाहेर पडला.


बुद्धाच्या जन्माची आणखी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. जगाला वाचवण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे अशा मुलाचा जन्म झाला आहे, अशी घोषणा करण्यासाठी सगळे देव एकत्र झाले. त्या वेळी महामाया राणीनं एक आठवडाभर चाललेल्या मेजवानीत भाग घेतला

होता. नंतर ती आपल्या देखण्या वेशात रथात बसलेली असताना तिला झोप लागली. त्या वेळी तिला हिमालयात नेलं गेलं आहे, असं स्वप्न पडलं, तिथे एका सोन्याच्या महालात एका पांढऱ्या हत्तीच्या रूपात तिला भावी बुद्ध स्वप्नात दिसला. त्यानंतर तिथल्या विद्वानांनी आता बुद्धाचा जन्म होईल आणि तोच जगातल्या पापांचं क्षालन करेल, अशी भविष्यवाणी केली. त्याप्रमाणे बुद्ध जन्मला, अशी ही दंतकथा सांगितली जाते.


या आणि अशा अनेक दंतकथांवर बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. धर्मानंद कोसंबी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांसारख्या अनेक विचारवंतांनी अशा दंतकथांची चिकित्सा करून त्यांचं खंडन केलं आहे.


काही कथांप्रमाणे आपल्या शिक्षणातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी सिद्धार्थ काही विद्वान ब्राह्मणांकडे गेला. त्यांनी सिद्धार्थला हिंदू धर्मातल्या काही गोष्टी शिकवल्या. त्यातून त्याला त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली; पण त्याचं पूर्ण समाधान झालं नाही. त्यानं आपल्या वैभवशाली आयुष्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलं. स्वत:ला शिक्षा म्हणून अत्यंत साधं आणि काटकसरीनं राहणं आणि कंदमुळं आणि फळं हाच आहार ठेवणं, फरशीवर झोपणं आणि अन्य शारीरिक कष्ट उपसणं यात आनंद मानणं असं सगळं सुरू ठेवलं. या काळात त्याला काही शिष्यही मिळाले, पण अद्याप त्याच्या कल्पना परिपक्व झाल्या नसल्यानं त्यातले काही जण निघून गेले. एका कथेप्रमाणे सहा वर्ष भटकल्यानंतर


सिद्धार्थ गया शहराजवळच्या एका भल्यामोठ्या


वृक्षाखाली (बोधिवृक्ष) काहीही अन्नपाणी घेता चक्क ४९ दिवस आणि ४९ रात्री बसून स्वतःचा शोध घेत राहिला. त्या जंगलात त्यान काढलेल्या सात आठवड्यांच्या कालावधीन त्याच्यात पूर्ण कायापालट झाला आणि सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला.


आपल्याला आता काय करायचंय आहे हे  कळल्यानंतर सिद्धार्थ आनंदित झाला. त्याने आता आपले पूर्वीचे अनुयायी गोळा केले त्यानंतर त्यानं आपलं पहिलं प्रवचन दिल माणसाला आयुष्यात तीनच पर्याय असतात, असं त्यानं सांगितलं. पहिला म्हणजे जगातल्या भौतिक सुखाच्या मागे धावणं, सिद्धार्थ आत्तापर्यंत याच स्वार्थी आणि निरर्थक मार्गाने चालला होता. दुसरा म्हणजे स्वतःतलं चैतन्य नष्ट करणं आणि पूर्वी केलेल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून स्वतः अपराध्यासारखं वागणं सिद्धार्थ याही अवस्थेतून गेला होता; पण या अवस्थेतही आत्मक्लेश केल्यानंतरही त्याला आत्मशांती मिळाली नव्हतीच. बुद्धाच्या मते तिसरा पर्याय किंवा तिसरा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. या मार्गावरून चालल्यानं सुख आणि शांततामय आयुष्य जगता येणार होतं.


बुद्ध हा मूर्तिपूजेच्या विरुद्ध होता. धार्मिक विधी आणि सण यांच्यावरही त्याचा विश्वास नव्हता. माणूस हाच त्याच्या केंद्रस्थानी होता. आपणच आपलं भविष्य घडवू शकतो; देव नाही. तसंच तो आपल्याच कृत्यानं आणि वागणुकीनं मोक्षापर्यंत जाऊ शकतो, कुठल्याही धार्मिक विधींमुळे नाही, असं तो म्हणे.


सिद्धार्थनं केलेली अथक भ्रमंती आणि त्या प्रवासातले अनुभव आणि तपश्चर्या यांनी सिद्धार्थला बिहारमधल्या बुद्धगया या स्थानावर ज्ञानप्राप्ती झाली. राजपुत्र आता गौतम बुद्धामध्ये रूपांतर झालं होतं आणि स्थानं जो धम्म स्थापन केला, त्याचं नाव बौद्ध धम्म! हा बौद्ध धम्म पुढे जगभर पसरला. आपला पहिला उपदेश वाराणसीजवळच्या सारनाथ या ठिकाणी बुद्धानं दिला. या पहिल्या उपदेशपर प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन अस संबोधलं जातं. बौद्ध धम्माचे नीतिनियम, बुद्धानं सांगितलेले विचार एका ग्रंथात समाविष्ट आहेत आणि या ग्रंथाचं नाव आहे 'त्रिपिटक' किंवा 'तिपिटक' संपूर्ण आयुष्य बुद्ध आपली शिकवण देत राहिला. त्याचं वय ८० पेक्षा जास्त झालं होतं आणि त्याला आपला मृत्यू समोर दिसायला लागला होता. त्याचे शिष्य त्याच्याभोवती जमून रडायला लागले होते. 'तुमच्यानंतर तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, असं ते त्याला म्हणाले, तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाला, 'माझी जागा कोणी घेण्याची गरजच नाही. माझे विचारच आता जगाला दिशा दाखवतील!'


ज्या वेळी गौतम बुद्धाच महापरिनिर्वाण झालं, त्या वेळी सुभद्र नावाच्या भिक्खूनं आता आपल्याला बुद्धानं सांगितलेले विचार पाळायची काही आवश्यकता नाही, असं इतरांना म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून इतर बौद्ध भिक्खू खूपच चिंतित झाले. कुठलेही नीतिनियम न पाळता सुभद्रच्या म्हणण्याप्रमाणे स्वैरपणे जगायचं हे या इतर भिक्खूंना मान्य नव्हतं. त्यामुळे ५०० भिक्खूंनी एकत्र येऊन बुद्धाचे विचार आणि बुद्धानं केलेला उपदेश हे सगळं काही संग्रहित करायचं ठरवलं. सगळ्यांनी एकत्र येऊन सहा ते सात महिने अहोरात्र काम करून पहिली बुद्ध धम्मसंगती तयार केली. म्हणजेच त्रिपिटक या ग्रंथाची निर्मिती केली. यानंतर १०० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा ७०० बौद्ध भिक्खू एकत्र आले आणि त्यांनी सहा महिने काम करून 'दुसरी धम्मसंगती तयार केली. या दुसऱ्या धम्मसंगतीत पहिल्या धम्मसंगतीच मजबूत करण्याचं काम केलं गेलं होतं. थोडक्यात, पहिल्यापेक्षा दुसरी धम्मसंगती जास्त अपडेटेड व्हर्जनमध्ये होती. त्यानंतर २३६ वर्षांनी 'तिसरी धम्मसंगती तयार करण्यात आली आणि ही तयार करण्यात सम्राट अशोकानं पुढाकार घेतला होता. सम्राट अशोकानं १००० भिक्खूंना एकत्रित करून ही धम्मसंगती तयार केली. हिला तयार करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर श्रीलंकेचा राजा वटगामणी यानं 'चवथी धम्मसंगती ५०० भिक्खूना घेऊन सहा महिन्यांच्या कालावधीत तयार केली. यानंतर १८७१ साली बर्मा (आणि आताचं म्यानम्यार) देशाच्या राजान पाचवी धम्मसंगती' तयार करण्यात पुढाकार घेतला आणि ही धम्मसंगती मंडाले पर्वतावर तयार झाली. यानंतर 'सहावी धम्मसंगती' पुन्हा बर्मा देशाचे तत्कालीन पंतप्रधान बुनो यानं अपडेट केली. बुनोन भारत, चीन, जपान, थायलंड अशा जगभरातल्या देशांमधल्या २५०० बौद्ध भिक्खूंना निमंत्रित केलं आणि दोन वर्षांच्या कालावधीत पहिल्या पाच धम्मसंगतीपेक्षाही ही 'सहावी धम्मसंगती' आणखीनच बळकट केली. इतकंच नाही तर बुनोनं 'त्रिपिटक' ग्रंथाची छपाईदेखील केली आणि त्यानंतर मात्र ही सहावी धम्मसंगती किंवा 'त्रिपिटक' हा ग्रंथ सर्वत्र वापरला गेला. 'त्रिपिटक' या ग्रंथात एकूण १७ ग्रंथांचा समावेश आहे. म्हणजेच बुद्धधम्माच्या ‘त्रिपिटक’ची निर्मितीची सुरुवात ५०० मिक्खूपासून सुरू झाली आणि त्यात पुढे अनेक जण सामील झाले.

'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे. बुद्धानं दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्ये सांगितली आहेत. बुद्धानं सांगितलेल्या आर्यसत्यांमध्ये पहिल्यांदा दुःख आहे. त्यानंतर त्या दुःखाचा समुदय म्हणजेच त्या दुःखाची कारणं आहेत आणि नंतर त्या दुःखाचा निरोध म्हणजेच त्या दुःखाचं निवारण आहे. त्या दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे दुःख निवारणाचा मार्गही सांगितला आहे. बुद्ध म्हणतात, आनंद दोन प्रकारचे असतात. आपल्याला हवं ते मिळालं की आनंद होतो. खरं तर हा आनंद क्षणिक असतो आणि काही क्षण यात आनंद मिळाल्याचा केवळ भास होतो. खरं तर आपण या क्षणिक आनंदाच्या हव्यासासाठी दुःखालाच आमंत्रण देत असतो आणि दुसरा आनंद समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर मिळतो. हा खरा आनंद असल्याचं बुद्ध सांगतो. तसंच दुःखाचं कारण मनुष्य नेहमीच दुसऱ्याकडे बोट दाखवून सांगतो. दुसऱ्या कोणामुळे तरी आपल्याला दुःख भोगावं लागतंय असं त्याला वाटत राहतं. तो नेहमी याबाबतीत दुसऱ्याला दोष देत राहतो. मात्र आपली स्वत:ची न संपणारी तृष्णा आणि भूक हेच खरं तर दुःखाचं कारण असतं आणि तेच मनुष्याला समजत नाही. त्याला जे हवं, ते मिळाल्यावर त्यानं सुखी व्हायला हवं; पण प्रत्यक्षात तसं होत नाही. ती गोष्ट. मिळाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गोष्टीची तहान त्याच्या मनात निर्माण होते. तसंच इतरांपेक्षा मी जास्त चांगला आहे असं दाखवत राहणं या हव्यासापोटीदेखील मनुष्य दुःखाला आमंत्रण देत राहतो. त्यामुळे बुद्ध सांगतात की, इतरांना दोष न देता, स्वतःच्या अंतर्मनात माणसानं डोकावून बघायला हवं. 'मी' आणि 'माझा' हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत आणि अंतर्मनात डोकावून बघितल तर दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग सहजपणे सापडतो. दुःखाच मूळ कारण समोरचा नसून आपणच आहोत हे सत्य जेव्हा मनुष्याला कळतं, तेव्हा त्याला त्या दुःखाला दूर करण्याचा मध्यम मार्ग किंवा उपायही सापडतो.


गौतम बुद्धांनी 'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये अष्टांग योगाविषयी सांगितलं आहे. खरं तर महर्षी पतंजलीनं या अष्टांग योगाविषयी पहिल्यांदा माहिती दिली. यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधीविषयी सांगितलं, पण सर्वसामान्य लोकांना समाधी म्हणजे काय हे नीटपणे समजलं नव्हतं. ते बुद्धानं त्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं. बुद्धानं आयुष्यात येणाऱ्या दुःखाविषयी वक्तव्य केलं. त्यानं दुःखाच्या निवारणासाठी अष्टांग मार्ग (उपाय) सांगितले.


पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी! बुद्धानं प्रत्येक वेळी 'सम्यक' हा शब्द वापरला आहे. सम्यक या शब्दाचा अर्थ म्हणजे मध्यम मार्ग होय, तर पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे ते तसंच बघणं, आपले पूर्वग्रह, आपली समजूत त्यामध्ये न आणता निरपेक्षपणे ती गोष्ट बघणं. दुसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक संकल्प! जे करण्यायोग्य आणि करण्यासारखं आहे त्याचा संकल्प करणं. तिसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक वाक् होय. जसं आहे तसं आणि तेच बोलणं. थोडक्यात, मनात एक आणि बाहेर एक असं बोलायचं नाही. चवथा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक कर्म. याचा अर्थ आपलं अंतःकरण जे सागतं त्याप्रमाणे कृती करणे. इतरांच ऐकून कुठलीही गोष्ट न करणं. पाचवा मार्ग सम्यक जीविका, सम्यक जीविका म्हणजे उपजीविकेसाठी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधण. मात्र हे करताना कुठल्याही हानिकारक मार्गाचा अवलंब न करणं. सहावा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक प्रयास, सम्यक प्रयास म्हणजे कुठल्याही कामासाठी आळस न बाळगता आवश्यक ते प्रयत्न करणं. सातवा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक स्मृती. सम्यक स्मृतीनुसार योग्य गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि निरर्थक गोष्टी विसरून जाव्यात. आठवा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे कुठल्याही मादक द्रव्याचा आधार न घेता समाधीवस्थेला पोहोचण होय.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये बुद्धकाळातल्या भारताची राजनीती, अर्थनीती, सामाजिक व्यवस्था, शिल्पकला, संगीतकला, वेशभूषा, पेहराव, रीतिरिवाज, ऐतिहासिक, भौगोलिक आणि व्यापाराची परिस्थिती असे अनेक विषय मांडले आहेत. तसंच बौद्ध भिक्खूनी कसं आचरण केलं पाहिजे याविषयीचे नीतिनियमही यात सांगितले आहेत. यात जातककथाही सामील आहेत. हिंदू धर्मामध्ये रामायण आणि महाभारत यातल्या कथांना जे महत्त्व किंवा जे स्थान आहे, तेच स्थान बौद्ध धम्मामध्ये जातक कथांना आहे. जातक कथांमधून बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि उपदेश गोष्टींचा आधार घेऊन सांगितला आहे. यातून माणसाला अनेक दृष्टांत दिले आहेत. या कथांचं साहित्यिक मूल्यही खूप महत्त्वाचं आहे. जातक कथा एक प्रकारे बोधकथाच आहेत. जातक कथा आज जगभर पसरल्या आहेत.

गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही. आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा, अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही. अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल, अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही, तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं, आपली चूक निस्तरणं, आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात, असं बुद्ध सांगतो. स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.


बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही. आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं, असं बौद्धधम्मीय मानतात. 'क्रोधाला प्रेमानं वाईटाला चांगुलपणानं, स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं, असं बुद्धाने सांगितलं. चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वत:ला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो, असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे. मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे. असं म्हटलं जातं, की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यान है मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आ त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच कार शेतजमिनीवरची निरीक्षण करण्यात गेला होता 'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठ कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीठ जमिनीविषयी सांगितलं आहे. तस शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत. कधी, कुठल्या प्रकारची पिकं घ्यायला हवीत, त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत. त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असे म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधल जातं. ज्यानं सत्यापर्यंत सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान "त्रिपिटक'मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे. स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले आहेत. दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे. 'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा. कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका, कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे असं समजा,' असं बुद्धानं म्हटलंय. आपल्या मतांच्या बाबतीत दुराग्रही न राहता लवचीक राहण्याचा सल्ला बुद्ध देतो. 'अत्तदीप व्हा,' असं गौतम बुद्धानं म्हटलं. याचा अर्थ अत्तदीप म्हणजे हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार असून जीवन जगण्यासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी माणसानं स्वतःच घेतली पाहिजे आणि निर्भयपणे प्रसन्नपणे जीवनाला सामोरं गेलं पाहिजे. 'मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, तर कुठल्याही प्रश्नाची चिकित्सा करा, प्रश्न विचारा आणि त्यानंतर डोळसपणे निर्णय घ्या,' असंही बुद्ध म्हणतो. आपल्या वाणीची चार दुश्चरितं बुद्धानं सांगितली आहेत. ती म्हणजे खोटं बोलणं, चहाडी करणं, कठोर बोलणं आणि वायफळ बोलणं! याउलट वाणीची चार सुचरितं म्हणजे सत्य बोलणं, चहाड़ी न करणं, मधुर बोलणं आणि अर्थपूर्ण बोलणं!

विख्यात भारतीय इतिहासकार डी. डी. कोसंबी यांनी बोधिसत्त्व हे बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर मराठीतून नाटक लिहिलं आणि १९४५ मध्ये ते ग्रंथरूपात प्रसिद्धही केलं. हे प्रमुख नाटक चार अंकी आहे. इतिहासातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या अनेक धर्माचा खोलवर अभ्यास केला आणि त्यांना बौद्ध धम्मातल्या तत्त्वांची व्यापकता भावली. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्यतेचा कलंक मिटवत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्या वेळी स्त्रिया आणि शूद्र यांना समाजात अतिशय दुय्यम स्थान होतं, अशा वेळी बौद्ध धम्मानं या वर्गाला आपलंसं केलं, त्यांच्यात समतेचं मूल्य पेरलं. आज जगभरात ५३.५ कोटी इतकी बौद्धधम्मीय लोकांची लोकसंख्या आहे. एकूण लोकसंख्येच्या ७% लोक बौद्धधम्मीय आहेत. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सम्राट अशोकाचं प्रचंड मोठं योगदान आहे. भारत, चीन, जपान, इंडोनेशिया, कंबोडिया असा हा जगभर पसरलेला एक मोठा आणि महत्त्वाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा धम्म आहे. म्हणूनच बौद्ध धम्माचे संस्थापक गौतम बुद्ध आणि 'त्रिपिटक' या ग्रंथाला मार्गदर्शक मानून बौद्ध धम्माचे अनुयायी आज वाटचाल करतात!












Thursday, April 7, 2022

*छ.शिवाजी महाराजांनी जात जाणिव वजा करून स्वराज्यातील सैन्य उभे केले - डॉ. श्रीपाल सबनीस*

*छ.शिवाजी महाराजांनी जात जाणिव वजा करून स्वराज्यातील सैन्य उभे केले - डॉ. श्रीपाल सबनीस* *सविस्तर वाचा👇* https://www.jaihindnews.online/2022/03/blog-post_63.html ✍️ *प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*

*छत्रपती शिवाजी महाराजांनी जात जाणिव वजा करून स्वराज्यातील सैन्य उभे केले - डॉ. श्रीपाल सबनीस*

*छत्रपती शिवाजी महाराजांनी जात जाणिव वजा करून स्वराज्यातील सैन्य उभे केले - डॉ. श्रीपाल सबनीस* https://www.maharashtrajanbhumi.in/2022/03/Chhatrapati-Shivaji-Maharaj-raised-the-army-in-the-Swarajya-by-subtracting-the-caste-consciousness-Dr-Shripal-Sabnis.html

Thursday, December 23, 2021

२३ डिसेंबर कै. वाय. डी. माने आण्णा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

🙏 *प्रेरणादायी रक्तदान शिबिर* 🙏

💥 *कै.वाय.डी.माने (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त कागलच्या डी.आर.माने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे सलग २१ वर्ष आयोजन*  

*सविस्तर वाचा👇*
https://www.jaihindnews.online/2021/12/-drmanecollegekagal-blooddonationcamp-.html

✍️ *हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*

➖➖➖➖➖➖➖➖
*जय हिंद डिजिटल न्यूज मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇* https://chat.whatsapp.com/Go5gbubQQCGBsFH85LpDku
✒️ *जय हिंद डिजिटल न्यूज*✒️

YCMOU history

https://kundanmalake.blogspot.com/p/history-books.html?m=1